परंडा / प्रतिनिधी- 

 परंडा शहरात दोन ईसम गुटखा- तंबाखुजन्य पदार्थ बाळगुन असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाली होती. यावर स्था.गु.शा. चे पोनि- श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- महेश घुगे, समाधान वाघमारे, पोकॉ- बलदेव ठाकुर व परंडा पो.ठा. यांच्या संयुक्त पथकाने दि. 28.09.2020 रोजी 15.00 ते 16.00 वा. चे दरम्यान परंडा शहरात दोन ठिकाणी छापे टाकले.

यात पहिल्या ठिकाणी जावेद दाउद पठाण, वय 38 वर्षे हा स्वत:च्या ‘पठाण किराणा’ दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 32,010 ₹ किंमतीचा गुटखा, सुगंधी तंबाखू असा माल बाळगलेला तर दुसऱ्या ठिकाणी प्रदिप देवीदास खुळे, वय 27 वर्षे हा स्वत:च्या ‘राज ट्रेडर्स’ दुकानात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 49,390 ₹ किंमतीचा गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ असा माल बाळगलेला पथकास आढळला.

यावरुन परंडा पो.ठा. चे पोना- किरण हावळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.स. 188 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये पो.ठा. परंडा येथे स्वतंत्र 2 गुन्हे दि. 28.09.2020 रोजी नोंदवण्यात आले आहेत.

 
Top