उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी MH25AS ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नविन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते व त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो. बऱ्याचवेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा,यासाठी ज्या चारचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत. अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल (उदा. लाईट बील,टेलीफोन बील इ.). तसेच आकर्षक क्रमांकासाठी देय असलेल्या विहित शुल्काच्या डी.डी. अर्जासह जमा करणे बंधनकारक आहे.
हा डीडी फक्त Deputy Regional Transport Officer, Osmanabad याच्या नावे केवळ राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डी.डी. बाद ठरवले जातील. तसेच डीडी व्यतिरिक्त बँकेने जारी केलेले बँकर्स चेक स्विकारले जाणार नाहीत. डीडी कमीत-कमी एक महिना मुदतीमधील असावा. एकाच नंबरसाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास दिनाक 13 जुलै 2020 रोजी नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जर जास्त रक्कमेचा एकच डी.डी. जमा करावयाचा असेल तर त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शविलेल्या दिवशी सीलबंद लिफाफ्यात कर्यालयात जमा करावा.
लिलावासाठी सादर केलेला डी.डी 300 रुपयापेक्षा कमी रकमेचा नसावा. हा डीडी फक्त Deputy Regional Transport Officer,Osmanabad याच्या नांवे केवळ राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. या व्यतिरिक्त इतर नावाचे डी.डी.बाद ठरवले जातील. डीडी कमीत-कमी एक माहिना मुदतीमधील असावा. एकाच क्रमांकाचे दोन किंवा अधिक प्राप्त झालेल्या अर्जांवर दिनांक 14 जुलै 2020 रोजी दुपारी 12.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदार यांच्या समक्ष लिफाफे उघडले जातील.ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डीडी सादर केला असेल त्यास सदरचा पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणीसाठी वाहन घेऊन येऊन वाहन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा. अन्यथा राखून ठेवलेल्या नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही. आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमुना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे.
नविन चारचाकी वाहनांसाठी MH25AS मालिकेचे वेळापत्रक
1.आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकाचे अर्ज व डी.डी. स्विकारणे. दि. 6 जुलै 2020 स. 11.00 ते दु. 4.00 . 2. एका क्रमांकाचे दोन किंवा अधिक अर्ज प्राप्त झालेल्या अर्जदारांची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणे- दि. 13 जुलै 2020 सकाळी 11.00. 3. एकाच क्रमांकाचे दोन किंवा अधिक प्राप्त झालेल्या अर्जासाठी अर्जदार, प्रतिनिधी यांच्याकडून बंद लिफाफ्यात डी.डी. स्विकारणे व त्यांचे समक्ष उघडून आकर्षक क्रमांकासाठी लिलाव करणे. दि. 14 जुलै, 2020 रोजी दुपारी 2.00 वाजेपर्यंत राहील, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार यांनी केले आहे.