उस्मानाबाद/ प्रतिनिधी
मागील भांडणाची कुरापत काढून परंडा तालुक्यातील कौडगाव येथील पती, पत्नीस सात जणांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी गुरुवारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रावण श्रीहरी माने घरासमोर थांबले होते.
यावेळी गावकरी पाटील चौरंग ठवरे, आप्पा ठवरे, बालाजी ठवरे, विजय गोफणे, दत्ता गोफणे, सुखदेव गोफणे या सर्वांनी बेकायदेशीर जमाव जमवून पूर्वी भांडणाची कुरापत काढून श्रावण माने यांना काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच मारहाण सोडवण्यास आलेल्या पत्नी संगीता यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.