उस्मानाबाद/प्रतििनधी-
जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच स्थावरचेही नुकसान झाले. याची नोंद घेऊन तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे.
१३ एप्रिल रोजी जिल्ह्यासह मराठवाड्यात प्रचंड वेगाचा वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे तसेच फळबागा, पालेभाज्या, फळभाज्या या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सारे भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. प्रचंड वेगाचा वादळी वारा यामुळे मोठ्या प्रमाणात स्थावर नुकसानही झालेले आहे. जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकरी आधीच सततचा दुष्काळ, नापिकी व नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झालेला असुन अन्नदाता शेतकरी हताश व निराश झालेला असुन मराठवाड्यात यापुर्वी १८ मार्चला दुपारी व रात्री झालेल्या वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीनेही शेतक-यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याबाबत २० मार्चला पत्र देऊन शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली आहे. अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. परत १३ एप्रिल रोजी उस्मानाबाद जिल्हयासह मराठवाड्यात प्रचंड वेगाचा वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतक-यांचे अतोनात नुकसान झालेल्या शेतक-यांची आणि प्रचंड वेगाच्या वादळी वाऱ्यामुळे स्थावर नुकसान झालेल्या लोकांची नोंद घेऊन तातडीने मदत देऊन दिलासा द्यावा,असे आ. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.

 
Top