उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा परिषद उस्मानाबादच्या शिक्षण विभागात शालेय पोषण विभाग प्रमुख सचिन पडवळ (४२) यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्याच्या पार्थिवावर त्याच्या शेतामध्ये अंतीम संस्कार करण्यात आले.
अंतीम संस्काराच्या वेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागासह मोठया संख्येने कर्मचारी वर्ग, नागरिक, नातेवाईक उपस्थित हेाते. सचिन पडवळ यांच्याकडे शालेय पोषण विभाग प्रमुख पद असल्यामुळे नेहमीच ते ताण-तणावाच्या छायेत ते असत.शालेय पोषण आहार किती आला, निधी निधी किती आला, स्वंयपाक करणा-याचे मानधन किती दिले आदी विविध प्रश्रांचे उत्तर देण्यासाठी व ठेवण्यासाठी त्यांना नेहमीच कसरत करावी लागत होती. शनिवार दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता उपळा येथील त्यांच्या शेतात फिरत असताना त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.