धाराशिव (प्रतिनिधी)- जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर ऑलिम्पिकचे स्वप्न उराशी बाळगत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाला गवसणी घालणाऱ्या धाराशिवच्या सुवर्णकन्या सई सापते हिच्या देदीप्यमान यशाचा संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला अभिमान आहे. सईचे हे यश केवळ एका पदकापुरते मर्यादित नसून, तिच्या जिद्दीचे, कठोर परिश्रमाचे आणि उज्ज्वल क्रीडा भविष्याचे प्रतीक आहे. असे प्रतिपादन धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे यांनी केले.
राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटातून धाराशिवच्या सई गणेश सापते हिने सुवर्णपदक पुटकाविल्या बद्दल, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी आरंभ शिंदे आणि त्यांचे मार्गदर्शक आनंद केंद्रे यांचा धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित सत्कार सोहळ्यात नितीन काळे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राज्य कुस्तीगीर परिषदेचे मराठवाडा विभागीय सचिव पैलवान वामनदादा गाते, सहायक गटविकास अधिकारी संतोष नलावडे, जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव प्रविण गडदे, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, क्रीडा संघटक उदय काकडे, चंद्रकांत पवार, गणेश सापते, रवि गोडसे, ओंकर नायगावकर अविनाश शिंदे, पैलवान मनोज जाधवर, वैभव शितोळे, यश माळाळे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
