कळंब (प्रतिनिधी)- कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण तसेच पुतळ्याला हायड्रोलिक सिस्टीम बसविण्याबाबतची मागणी संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींच्या वतीने आमदार कैलास पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे, तसेच पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करून ऐतिहासिक वारशाला साजेसे स्वरूप प्राप्त व्हावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेऊन संबंधित कामासाठी आवश्यक पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींनी व्यक्त केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, शिवप्रेमी व नागरिक उपस्थित होते.
