मुरुम (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील शिंदगाव येथे आमदार बसवराज पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.  आमदार पाटील यांनी दुष्काळ निमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. तेथील पाणी टंचाई रोजगार चारा टंचाई याबाबत संवाद साधला.  ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे आमदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, मुरुमचे माजी नगराध्यक्ष रशीद शेख,जळकोट येथील समाजसेवक भीमाशंकर हासुरे, शरण पाटील होर्टीकर, सोसायटीचे माजी चेअरमन अण्णाराव कुलकर्णी, प्रकाश बेडजिरगे माजी ग्राम पंचायत सदस्य प्रताप पाटील गुरुनाथ परमशेट्टी गंगाधर पेठ सांगळे विजयकुमार पेठ सांगळे सातप्पा परशेट्टी, खंडू चव्हाण रवी पाटील स्वामी आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन तानाजी घोडके यांनी केले. तत्पुर्वी सिंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कलशेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार पाटील यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.

 
Top