भूम (प्रतिनिधी)-  दुष्काळाच्या झळांनी आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी जनविश्वास समूहाच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपत 400 कुटुंबांची दीपावली गोड करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ कोष्टी गल्ली येथील समूहाच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी पहिल्या टप्प्यात 150 गरजू कुटुंबांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित 250 किट पालांवर राहणाऱ्या तसेच ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.

सहाय्यक निबंधक कुमार बारकुल, जनविश्वास समूहाचे संस्थापक अध्यक्ष संतोष वीर, क्रांतिदीप कांबळे, नगरसेवक सुनीता वीर आणि विठ्ठल बागडे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संस्थेच्या व्हॉईस चेअरमन संध्या वीर,दीपक बोबे, रवी लोंढे,सुजित जिकरे,सोमनाथ टकले ,उमेश काळे,कल्पेश राऊत, बाळू गुंड आदी उपस्थित होते. 


 
Top