धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी सम्राट अशोकानंतर 5 लाख अनुयायासह 14 ऑक्टोंबर 1956 रोजी बौध्द धम्म दिक्षा घेणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयास संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
