धाराशिव (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवाच्या पावन पर्वानिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या पवित्र चरणी तुळजापूर येथे 51 महिलांच्या सहभागातून श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन आणि कुंकुमार्चनाचा मंगलमय सोहळा अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
आदिशक्तीच्या आराधनेतून, सप्तशतीच्या पवित्र पाठातून आणि कुंकुमार्चनाच्या मंगलमय सेवेतून आई जगदंबेच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होण्याचे परमभाग्य लाभले. शारदीय नवरात्राच्या या पवित्र पर्वावर आई तुळजाभवानी मातेची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो. प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो. सर्व संकटांचे निवारण होवो, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि भक्तीचा हा पवित्र प्रवाह अखंड सुरू राहो, हीच आई भवानीच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना. आई जगदंबे, तुझ्या चरणी कोटी कोटी नमन. तुझा आशीर्वाद सर्व भक्तांवर सदैव राहो. आई राजा उदो उदो! जय तुळजाभवानी माता जय जगदंबे जय भवानी.