तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज मंगळवार रोजी श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार पूजा संपन्न झाली. शारदीय नवरात्रीतील आजची तिसरी माळ आहे.
सोमवारी रात्री श्री तुळजाभवानी देवींची नंदी या वाहनातून छबीना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी यांच्यासह पुजारी, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.



