परंडा (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत सकल मराठा समाजाने गुरुवारी दि.3 रोजी सकाळी 11 : 30 वा.परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दोन तास रस्ता रोको आंदोलन केले व परंडा तहसीलदार निलेश काकडे व पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले यांना निवेदन देण्यात आले .परंडा बंदला ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार, बाजारपेठ ठप्प होती.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली .मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दि . 29 ऑगष्ट पासून उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे शासनाने त्यांच्या प्रकृतीची तातडीने दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी त्वरित सकारात्मक पावले उचलावीत, अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन समाजाच्या मागण्यांची पूर्तता करावी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तत्काळ गतिमान करावी. सरकारी नोकरभरतीमध्ये मराठा आरक्षणाचा लाभ लागू करावा. मनोज जरांगे पाटील यांच्याशी शासनाने तातडीने चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा.
मराठा समाजावर होणारा अन्याय थांबवून शासनाने आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका जाहीर करावी.मनोज जरांगे पाटील यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची तातडीने दखल घेऊन त्यांचे उपोषण सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.सरकारने दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली.
