धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील कलाविष्कार अकादमी द्वारा होशी छंदी गायकाचा मेलडी स्टार्स च्या वतीने प्रख्यात गायक मुकेश यांच्या पुण्यतिथीदिनी गायनातून आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी समुह प्रवर्तक युवराज नळे, समन्वयक मुकुंद पाटील, उपशिक्षणाधिकारी दत्त प्रसाद जंगम, शरद वडगावकर,शेषनाथ वाघ, नितीन बनसोडे, राजाभाऊ कारंडे, प्रसाद धाबेकर, धनंजय कुलकर्णी, सुनिल जगताप यांनी मुकेश यांनी गायलेले गाणे गायले.
