धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये रक्षाबंधन सनानिमित्त इ.5 वी,6वी ,7 वी विभागात राखी तयार करणे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण 350 विद्यार्थीविद्यार्थांनी सहभाग घेऊन अतिशय सुबक सुंदर राखी तयार केल्या त्याच राखी त्यांनी आपल्या भगिनी कडून बांधणार व भगिनी भावास बांधणार आहेत. अश्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्यगुण विकसीत होऊन उद्योजक होण्यास प्रेरणा मिळते असे मनोगत मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांनी व्यक्त केले . या स्पर्धेसाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम इ.7 वी चे पर्यवेक्षक बालाजी गोरे , इ.6वी पर्यवेक्षक राजेंद्र जाधव, 5 वी पर्यवेक्षक शेषनाथ वाघ उपस्थित होते. स्पर्धा प्रमुख 7 वी संगीता शिंदे,6 वी एस.एस. ईश्वरगौडा, 5 वी एस.डी.बीरगड, सुरज सपाटे तसेच सर्व शिक्षकशिक्षिका वृंदानी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
