धाराशिव (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला काय द्यायचे ? असेल तर ते डॉ. आंबेडकर यांचे विचार देणे गरजेचे आहे. तेव्हाच कुठेतरी शिक्षणानंतर आपली प्रगती होऊ शकते, शिक्षणाशिवाय माणसाच्या आयुष्यात परिवर्तन होत नाही. आपण आज या सगळ्या गोष्टीचा विचार करीत आहोत. तत्कालीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने तेच आपले आयडॉल असले पाहिजेत असे प्रतिपादन शिवसेना उपनेते तथा माझी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दि.30 ऑगस्ट रोजी केले.

धाराशिव तालुक्यातील तगर भूमी येथे वर्षावास महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

यावेळी भिक्खू डॉ उपगुप्त महाथेरी, भन्ते सुमेधजी नागसेन, भन्ते महाविरो थेरो, भंते अश्वजीत, भन्ते बुद्धघोष काळेगावकर, भन्ते कमल धम्म, जिल्हा परिषद महिला व बाल विकास सभापती पूजाताई शिंदे, पोपटराव सोनटक्के, राजाभाऊ ओव्हाळ, कैलास शिंदे, अनिल हजारे, नम्रता शिंदे, विमल रणदिवे, ओहाळताई, रमेश कांबळे आदींसह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना चौगुले म्हणाले की, जे-जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचतील आणि त्यांचा विचार आचरणात आणतील त्यांचा उत्कर्ष निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे पुढच्या पिढीला आंबेडकरांचे विचार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सध्याच्या दिशाहीन तरुणांईला योग्य मार्ग दाखवण्यासाठी भन्तेजी जे सांगतील ते ऐकण्यासह त्यांचे आचरण करावे असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे डॉ आंबेडकरांचे विचार जगाला सांगून भागत नाही तर वास्तुरूपाने पटलावर आले पाहिजेत असे सांगत ते म्हणाले की, त्यासाठी विहार उभारणे काळाची गरज आहे. पुढच्या पिढीला काय द्यायचे असेल तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकर यांच्यामुळेच मला विधानसभेच्या सभागृहात विविध विषय मांडून ते प्रश्न सोडवून घेण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तर तगर भूमी विकसित करण्यासाठी या ठिकाणी चांगला प्लॅन बनवून टप्प्याटप्प्याने आगामी चार-पाच वर्षांमध्ये निश्चितपणे या भागाचा विकास केला जाईल. तसेच या भागात येण्यासाठी रस्त्याची समस्या असून या भागात डोंगर असल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. डोंगर जेसीबी मशीनने फोडता येत नाही. त्याऐवजी टू टेन (पोकलेन) मशीन मी स्वतः उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर भिक्खू डॉ उपगुप्त महाथेरी म्हणाले की, बुध्दीमान माणसे उडवली पाहीजे, देशात कुठेही खोदले तर तर त्या उत्खननामध्ये फक्त आणि फक्त बुद्धच निघत आहेत त्यामुळे हा देश पूर्वीही बुद्धाचा स्वतः आजही बुद्धाचाच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच बुद्धाचा धम्म आतून आणि बाहेरून शिलवान, गुणवान बनण्यासाठी बुध्द विहाराची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महापुरुषांनी पाली भाषा दिलेली असल्यामुळे येथील लोक मराठी भाषेप्रमाणेच पुन्हा पाली भाषेत बोलतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  बुद्ध विहार केंद्रीय उभा करून त्या माध्यमातून धम्माचा प्रसार आणि प्रसार व्हावा आणि बुद्धिमान व चारित्र्यवान नागरिक घडावेत हाच या मागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भन्ते सुमेधजी नागसेन,भन्ते महाविरो थेरो, भंते अश्वजीत, भन्ते बुद्धघोष काळेगावकर, भन्ते कमल धम्म यांनी धम्मदेशना दिली. या कार्यक्रमात शाहूनगर वर्षावास महोत्सव समितीच्यावतीने केळीचे वाटप करण्यात आले. यावेळी सुभाष बनसोडे, जया बनसोडे, मंगल बनसोडे, सुनिता वाघमारे, अमोल वाघमारे, लक्ष्मण बनसोडे, रमेश कांबळे, संपत शिंदे, राम चंदनशिवे, बाळासाहेब माने, विमल रणदिवे, ओहाळ, विष्णू कांबळे, रमेश गवळी, धाराशिव, घाटंग्री, खानापूर आदी परिसरासह सोलापूर, लातूर, बीड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top