धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 70 विद्यार्थ्यांना प्रशालेच्या विद्यार्थी कल्याण मंडळ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मोफत गणवेश वाटपासोबत शालेय दफ्तर, वह्यांचेही वितरण करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या सचिव प्रेमाताई सुधीर पाटील यांनी शिक्षणाच्या प्रवाहापासून एकही विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव वंचित राहू नये, ही नैतिक जबाबदारी समाजाची असून आपण सर्वांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे, हा विचार या प्रसंगी मांडला. प्रथम मान्यवरांचा उचित सत्कार प्रशालेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्था सचिव प्रेमाताई पाटील, शारदा भावसार, एन.एल. गोरसे व प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम,पर्यवेक्षक कुमार निकम, बी. बी. गुंड, उपस्थित होते .
या विभागात कार्यरत असणाऱ्या सुरेखा देशमाने, सूर्यकांत पाटील, शरद करडे, रामेश्वर बोबडे व दयानंद शिराळ, अरविंद जाधव ,सुरज सपाटे यांच्या सहकार्य व परिश्रमातून गणवेशाचे वितरण व हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील यांनी केले. तर शेवटी सर्वांचे आभार नंदकुमार नन्नवरे यांनी मानले.
