तेर( प्रतिनिधी )- आषाढी एकादशीच्या निमित्ताने धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पहाटे पासूनच मंदिरात दिवसभरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती."विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल " "श्री संत गोरोबा काका महाराज की जय " "जय जय राम कृष्ण हरी"नामगजराने भाविकभक्त यांनी जयघोष केला.आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांच्या जयघोषाणा मंदिर व मंदिर परीसरात वातावरण भक्तिमय झाले होते.मिळेल त्या वाहनाने भाविकभक्त दर्शनासाठी येत होते.आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री संत गोरोबा काका यांचें रूप मनामनात साठविण्यासाठी भाविकभक्त आतुरतेने दर्शनासाठी मनोभावे वाट पाहत होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने तेर येथील पुरातन श्री त्रिविक्रम मंदिरात १३ व्या शतकात श्री संत गोरोबा काका यांच्या मार्गदर्शनाखाली संत मेळावा भरत असल्याने भाविकभक्त यांनी श्री त्रिविक्रम मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

