तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील हि परगा .परिसरातील पवनचक्कीला गुरुवारी (दि. 23) लागलेल्या आगीने केवळ एक दुर्घटना घडवली नाही, तर संपूर्ण  जिल्ह्यातील पवनचक्क्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

यामुळे पवनचक्की उभारणीबाबत भिलाई पार्क पणा करणाऱ्या कंपनीवर काय कारवाई करणार असा सवाल आता परिसरातील ग्रामीण जनतेतून होत आहे सदरील कंपन्या ठेकेदाराकडून विविध कामे उरकून घेतात असे समजते त्यामुळे ठेकेदारावरही कारवाई होणार का असा सवाल आता विचारला जात आहे यामुळे पवन चकी सुरक्षा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

शेकडो फूट उंचीवरील पवनचक्कीच्या वरच्या भागाला आग लागल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले; मात्र उंचीमुळे प्रत्यक्ष आग विझविणे शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पवनचक्की कंपन्यांच्या आपत्कालीन व्यवस्थेचे स्वतंत्र सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पवनचक्कीच्या पात्याजवळील यंत्रणा जळून नुकसान झाले. तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांमध्ये वरून जळणारे ब्लेड किंवा यांत्रिक भाग खाली कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरतो.


कंपन्यांकडे आपत्कालीन आराखडा आहे का?

या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पवनचक्कीला आग लागल्यास संबंधित कंपनीकडे आपत्कालीन कृती आराखडा आहे का? स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का? कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे का? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे.

मते पवनचक्कीला आग लागल्यानंतर सर्वप्रथम मुख्य वीजपुरवठा तातडीने बंद करणे आवश्यक असते. त्यानंतर घटनास्थळी मोठा सुरक्षा परिघ तयार करून नागरिक, शेतकरी आणि कामगारांना सुरक्षित अंतरावर हलविणे गरजेचे असते. कारण पवनचक्कीची उंची साधारण 300 ते 600 फूट असल्याने ब्लेड किंवा नेसेल मधील जळणारे भाग खाली कोसळण्याची शक्यता असते. याचबरोबर स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि वीज वितरण यंत्रणेला तातडीने माहिती देऊन समन्वयाने बचावकार्य सुरू करणे आवश्यक असल्याचे अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद आहे.


स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा तपासली का?

आधुनिक पवनचक्क्यांमध्ये नेसेलमध्ये ऑटोमॅटिक गॅस किंवा एरोसोल फायर सप्रेशन सिस्टीम, धूर आणि तापमान सेन्सर्स, तसेच ओव्हरहिटिंग ओळखणारी यंत्रणा बसविली जाते. या प्रणाली कार्यरत होत्या का, त्यांची नियमित देखभाल झाली होती का आणि त्या प्रभावीपणे चालू झाल्या का, याची तांत्रिक चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.


प्रतिबंधात्मक उपायांकडे दुर्लक्ष?

तज्ज्ञांच्या मते गिअरबॉक्स, जनरेटर, ब्रेकिंग सिस्टीम आणि वंगण  यांची नियमित तपासणी, थर्मल मॉनिटरिंग, तसेच कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असते. विशेषतः उंच पवनचक्क्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी Escape Descent Devices  आणि नियमित मॉक ड्रिलही आवश्यक मानल्या जातात.


प्रशासन ऑडिट करणार का?

या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्व पवनचक्की प्रकल्पांमध्ये अग्निसुरक्षा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था, स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि सुरक्षा मानकांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन आणि संबंधित कंपन्या याबाबत काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Top