धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजाभवानी मातेच्या जुलै महिन्यातील सिंहासन पूजेच्या ऑनलाईन नोंदणीस प्रारंभ करण्यात आला आहे. सिंहासन पुजेसाठी इच्छुक भाविकांनी तुळजाभवानी मंदिर संस्थान्च्रू अधिकृत संकेतस्थळावर जावून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.  

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत असतात.  कुलदेवता तुळजाभवानी मातेच्या दरबारात कुलाचार, कुलधर्म व धार्मिक विधी पार पाडण्यासाठी भाविकांची विशेष गर्दी होत असते. श्री तुळजाभवानी मातेची सिंहासन पूजा अत्यंत महत्वाची व श्रध्देची पूजा मानली जाते. भाविकांच्या सोयीसाठी सिंहासन पूजेची नोंदणी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या https://online.shrituljabhavani.org या अधिकृत संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.  

सिंहासन पुजा नोंदणी 19 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरू झाली आहे. ती 24 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस 27 जून 2026 रोजी 11 वाजता पाठविण्यात येतील. भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 27 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजतापासून ते 28 जूनपर्यंत सकाळी 10 वाजतापर्यंत करावे.सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 28 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.

भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 28 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 29 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत करावे. प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी 29 जून रोजी सकाळी 11 वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 29 जून रोजी सकाळी 11 ते 30 जून  रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत करावे. माहे जुलै -2026 या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल. भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूरच्या व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.

 
Top