परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशिकत झालेला ' मराठवाड्यातील मुक्ती संग्रामातील झुंजार सेनानी  (ऐतिहासिक ठेवा ) परंडा येथील तु.दा.गंगावणे लिखित ग्रंथ लेखकानी त्यांना भेट दिला त्यावेळी धाराशिव जिल्ह्याचा एक ऐतिहासिक ठेवा हाती घेताच त्या भाऊक झाल्या आणि लेखकाचे त्यांनी कौतुक केले. असे साहित्य जनसामान्या पर्यंत पोहचले पाहिजे मराठवाड्यातील मुक्ती संग्रामाची गाथा प्रत्येक शाळेत असणे आवश्यक असल्याचे सांगितले कारण हे विचार हा इतिहास एक आदर्श आणि मार्गदर्शक ठरणार असल्याचे उद्गगार जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी काढले. यावेळी ग्रथाचे लेखक तु.दा.गंगावणे ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ.उषाताई रविंद्र गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे , जिल्हा परिषद सदस्य रेवनदादा ढोरे व जिल्ह्यातील शिक्षक वृंद मोठ्या संख्येने हजर होते.


 
Top