उमरगा (प्रतिनिधी)- गुणवत्ता असेल तर यश नक्की मिळते असे प्रतिपादन खासदार ज्योती वाघमारे यांनी केले. ज्ञानज्योती फाऊंडेशन, उमरगा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा शांताई मंगल कार्यालय, उमरगा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमात उमरगा व लोहारा तालुक्यातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करीअर मार्गदर्शन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ज्ञानज्योती पुरस्कार वितरण करण्यात आले. याचबरोबर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक अर्थसहाय्य शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. यावेळी डॉ.विजयकुमार फड यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.आकांक्षा चौगुले, अध्यक्षीय समारोप माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास माजी आमदार शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषाताई गायकवाड, नगराध्यक्ष किरण गायकवाड, लोहारा पं.स. सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, लोहारा नगराध्यक्षा वैशाली खराडे, गटशिक्षणधिकारी उमरगा अमोल राजपुत, गटशिक्षणाधिकारी लोहारा शिवकुमार बिराजदार, आदी मान्यवर हे उपस्थित होते.
सुनील माने, प्रवीणचंद्र तोतला, शेखर घंटे, रसिका कटकधोंड, गिरीष भगत, संतोष शिंदे, यांना ज्ञानज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पवार, संदीप जगताप यांनी केले. तर आभार प्रदर्शन विजय वडदरे यांनी केले.
