धाराशिव (प्रतिनिधी)-   युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, कौशल्य विकास आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे. नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,महाराष्ट्र शासन,समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद धाराशिव,यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग,धाराशिव यांच्या सहकार्याने आयोजित नशामुक्त भारत अभियानाचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि.17 जून) उत्साहपूर्ण वातावरणात के.टी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉ.गजानंद वाले हे होते. प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.संदीप तांबारे यांनी व्यसनांचे दुष्परिणाम यावर माहिती सांगितली. अध्यक्षीय समारोपात डॉ.गजानंद वाले यांनी केला. या कार्यक्रमास सनम लामकाने,अमोल कातंगले यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमात 200 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाजकल्याण विभाग,यश मेडिकल फाऊंडेशन आणि के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

 
Top