वाशी(प्रतिनिधी)- कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेमध्ये कला,वाणिज्य,विज्ञान व किमान कौशल्य शाखेमध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.अशोक कदम, प्रा.अजितकुमार तिकटे, प्रा.मिलिंद शिंदे व प्रा.महादेव उंदरे उपस्थित होते.
यावेळी विविध विभागातून यश संपादन केलेल्या कु.अक्षता कवडे,कु.मोहिनी चंदनशिवे,कु.राजनंदिनी गवळी,कु.अनिता लाखे,कु.वैष्णवी घोडके,कु.राधा गोयकर,कु.मयुरी उघडे,कु.गायत्री चौघुले,कु.साक्षी चोथवे.कु.प्रियंका जगताप,कु.अलवीरा बागवान,कु.स्नेहल ढगे,अजय गायकवाड,कु.प्रांजली थोरबोले व कु.माधुरी कांबळे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना मा.जयकुमार बापू शतोळे म्हणाले कि, या महाविद्यालयामध्ये शिक्षणाबरोबरच संस्कार दिले जातात देशाला चांगले मनुष्यबळ मिळण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यार्थांनी घ्यावे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.अशोक कदम म्हणाले कि,ग्रामीण भागातील विद्यार्थांनी मिळवलेले यश विशेष आहे या त्यांच्या यशामुळे आई वडिलांप्रमाणेच आम्हा शिक्षकांना आनंद झाला असून हे महाविद्यालय कर्मवीर डॉ. जगदाळे मामांची विचारधारा जपणारे महाविद्यालय आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा.मिलिंद शिंदे यांनी तर आभार प्रा.अजितकुमार तिकटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी, पालक, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
