धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आणि जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. यावेळी 337 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात येऊन नोंदणी केली व मुलाखती दिल्या. त्यापैकी 138 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
सदर मुलाखतीसाठी 14 आस्थापना मुलाखतीसाठी आलेल्या होत्या. सदर मुलाखतीचे आयोजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख आणि कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सुयोग अमृतराव, विक्रमसिंह घोलकर, अमोल बळे हे लाभले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालय विकास समितीचे सदस्य नानासाहेब पाटील हे होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी केली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केल.े तर आभार प्रा.डॉ. दत्तात्रय साखरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ग्रंथपाल डॉ.मदनसिंग गोलवाल उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्लेसमेंट आणि प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्रातील परिविक्षाधीन प्रशिक्षणार्थी सहा. आयुक्त दत्ता चव्हाण सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
