धाराशिव (प्रतिनिधी)- शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी धाराशिव नगर परिषदेकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, प्रभाग क्र. 20 मध्ये नगरसेवकांच्या पुढाकारातून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराद्वारे नागरिकांना अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व नियमांविषयी थेट मार्गदर्शन करण्यात आले.

नगर परिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अतिक्रमण नियमितीकरणासाठी अर्ज धाराशिव नगर परिषद कार्यालयात सादर करणे आवश्यक असून, त्यानंतर संबंधित प्रकरणांची छाननी व पडताळणी केली जाणार आहे. अर्जदारांनी आधार कार्ड, 01 जानेवारी 2011 पूर्वीचे मतदार यादीतील नाव, त्यापूर्वीचे वीज बिल, मालमत्ता कर पावती, नगरपालिकेची नोंद, अतिक्रमणाचे जुने व सध्याचे छायाचित्र, शपथपत्र तसेच इतर पूरक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. यानंतर भूमिअभिलेख विभागामार्फत मोजणी केली जाणार असून, 500 चौ. फूटपर्यंतचे अतिक्रमण विनामूल्य नियमित करण्यात येणार आहे. तर 500 ते 1500 चौ. फूट क्षेत्रासाठी बाजारमूल्यानुसार शुल्क आकारले जाणार आहे. सक्षम प्राधिकरणाकडून 10 दिवसांच्या आत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 
Top