भुम (प्रतिनिधी)- शंकरराव पाटील कनिष्ठ (स्वतंत्र) महाविद्यालय भुम येथे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा निकाल 2025-26 जाहीर झाला असून महाविद्यालयाने एकूण 89.63% इतका उल्लेखनीय निकाल प्राप्त केला आहे.
या निकालात विज्ञान शाखेचा निकाल 98.44%, वाणिज्य शाखेचा 96.82%, तर कला शाखेचा 77.94% इतका लागला आहे. सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी समाधानकारक यश संपादन केले आहे.
कला शाखा (12 वी)- प्रथम सलमा शब्बीर शेख (80.17%), द्वितीय श्रद्धा दादा गणगे (79.83%), तृतीय रानिया साहेबराव अंघोरे (74.33%), विज्ञान शाखा (12 वी)- प्रथम श्रावणी विशाल पंडित (69.33%), द्वितीय रीना अंकुश उबाळे (65.67%), तृतीय अस्मिता अमित गोसावी (61.83%)
वाणिज्य शाखा (12 वी)- प्रथम प्रणाली दत्ता जाधव (88.50%), द्वितीय धनश्री अशोक रुणे (71.17%),तृतीय मानसी सुनील टकले (70.67%)
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. महाविद्यालयाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे हा उत्कृष्ट निकाल लागल्याचे मत व्यक्त करण्यात आले.