धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने राज्यभर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे 08 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या काळात आयोजन केले आहे. धाराशिव येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. 08 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे समता सप्ताहाचे उद्दघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात धाराशिव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारप्राप्त साहित्यिक इतिहासाचे अभ्यासक विजय गायकवाड यांचा संविधान उद्देशिका देवून जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियवंदा महाडदळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, जात पडताळणी सचिव बलभीम शिंदे, सहाय्यक संचालक अमोल ताकभाते, सहाय्यक आयुक्त सचिन कवले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील कर्मचारीवृंद उपस्थित होते. या सन्मानाबद्दल गायकवाड यांचे मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.

 
Top