धाराशिव (प्रतिनिधी)- पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियानांतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्ग प्रमुखपदी ॲड. अनिल सुखदेव काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी मंगळवार, 28 एप्रिल रोजी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड.अनिल काळे हे मागील तीन दशकांपासून धाराशिव जिल्ह्यात राजकीय, सामाजिक व सहकारी क्षेत्रात सक्रिय असून तुळजापूर तालुक्यातील केमवाडी हे त्यांचे मूळ गाव आहे. त्यांनी बी.ए., एल.एल.बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने वकील व शेतकरी आहेत. सन 1995 पासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत असलेले काळे 2016 पासून भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत. तसेच मराठवाडा विभागातील ‌‘सुपर वॉरियर्स‌’चे सह समन्वयक म्हणूनही ते कार्यरत आहेत.

यापूर्वी त्यांनी केमवाडीचे सरपंच (2008 ते 2013), जिल्हा विधीज्ञ मंडळाचे सचिव (2004-05), तसेच भाजपमध्ये जिल्हा सरचिटणीस व उपाध्यक्ष अशी विविध पदे भूषविली आहेत. तुळजापूर शुगर प्रा. लि. काटी, तुळजाभवानी यंत्रमाग औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था, आदिशक्ती तुळजाभवानी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था आणि बालाजी दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळत आहेत.तसेच तुळजाभवानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत.. जलयुक्त शिवार अभियान, वृक्षारोपण, रक्तदान व आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग नोंदवला आहे.या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान राज्यात वेगाने विस्तारत आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याना प्रशिक्षण देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.



या अभियानांतर्गत शासनाच्या योजनांची माहिती, सोशल मीडिया व ए.आय, नमो ॲप, सरल ॲप, बूथ व्यवस्थापन तसेच संघटनात्मक प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण केंद्रे, कार्यशाळा व मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून युवकांची नोंदणी केली जात असून हे  आमदार राणाजगजितसिंह पाटील व मा.आ. सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांचे नेतृत्वाखाली अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया ॲड. अनिल काळे यांनी दिली.

 
Top