धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव नगर परिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते सिद्धार्थ अंगुल बनसोडे, नगरसेवक अक्षय जोगदंड यांनी मुंबई येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दोन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. 

आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी भाजपचे धाराशिव शहराध्यक्ष तथा गटनेते नगरसेवक अमित शिंदे, न. प. उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक अभिजीत पतंगे, माजी नगरसेवक दत्ता पेठे उपस्थित होते. धाराशिव नगर परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असुन 41 पैकी 22 नगरसेवक भाजपचे आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गट 8, शिवसेना उबाठा 7, काँग्रेस 3 व एमआयएम 1 असे संख्याबळ होते. 


 
Top