तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील बुकनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुढीपाडवा प्रवेश वाढवा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश वाढवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात  पालक, अशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच व्यवस्थापन समिती अध्यक्ष व  महिलांचा समावेश होता.यानिमित्त शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते .त्यानिमित्त शाळेत संगीत खुर्ची, उखाणे स्पर्धा व तळ्यात मळ्यात या स्पर्धा घेण्यात आल्या. विजयी स्पर्धकांना शाळेच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम प्रवेश पात्र मुलांचा प्रवेश घेण्यात आला तसेच त्यांना हार देऊन त्यांचे व त्यांचे पालकांचे स्वागत करण्यात आले. यानंतर गावातून जनजागृतीसाठी प्रभास फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनचा कार्यक्रम आहे घेण्यात आला.. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी.एस. खडके , पी.एच. पडवळ, आर.एम. जाधवर, एस.ऐ.सलगर, जयश्री बुकन, सुरेखा बुकन, स्वाती बुकन, पूजा कचार यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिनिनाथ शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.


 
Top