धाराशिव (प्रतिनिधी)- सचिन कचरुलाल बसैये यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
त्यांच्या या शोधप्रबंधासाठी त्यांना डॉ. श्रीकृष्ण चंदनशिव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. सचिन बसैये यांच्या या यशाबद्दल डॉ. सुयोग अमृतराव, संचालक व्यवस्थापन शास्त्र विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, धाराशिव तसेच डॉ. विक्रम शिंदे, डॉ. जितेंद्र शिंदे, वरुण कळसे, हेमंत बसैये, विभागातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि मित्रपरिवाराने त्यांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
