धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रहार दिव्यांग क्रांती व प्रहार जनशक्ती पक्ष, धाराशिव जिल्ह्याची आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस प्रहार पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लू झांजवळ, प्रहार दिव्यांगचे राज्याध्यक्ष धर्मेंद्रजी सातव, राज्य उपक्रम समन्वयक महेश बडे, तसेच धाराशिव संपर्क प्रमुख अमोल जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी सोलापूर प्रहार पक्षाचे सातलिंग स्वामी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान जिल्हा, तालुका व शाखास्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभागाचा अहवाल सादर करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील संघटना व पक्षाची सद्यस्थिती, भविष्यातील संघटनात्मक बांधणी आणि प्रहारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आगामी आंदोलन व विविध उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप बल्लू झांजवळ यांनी केला. बैठकीचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांचा सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीस संघटनेचे सर्व जिल्हा, तालुका व शाखास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीचे आयोजन प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी केले.

या बैठकीसाठी जमीर शेख, महादेव चोपदार,अमोल शेळके, इंद्रजीत मिसाळ,बाबासाहेब भोयटे, औदुंबर भणगे, राजेंद्र आकाडे, सतिश कोळगे, पिंटू क्षीरसागर, शाहजी शेरखाने, रामभाऊ तांबे, दिपक गव्हाणे, कुमार नरवडे, अमोल पाडे पाटील, कृष्णा राऊत, मारुती कांबळे, पाडे बारीकराव माळी आदी उपस्थित होते. 

 
Top