मुरुम( प्रतिनिधी)- अस्वच्छ परिसरामुळे नागरिक विविध आजाराला बळी पडतात. स्वच्छतमुळे मनुष्याला सुखकर निरोगी आयुष्य लाभते. त्यामुळेच स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे.’ असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले यांनी केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे व्हांताळ येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात बोलत होते. शिबिरातील स्वंयसेवक ग्रामस्थांच्या वतीने सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ वसंत हिस्सल तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सूर्यकांत रेवते उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ सूर्यकांत रेवते यांनी इ कचरा ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या आहे असे सांगून त्याच्या व्यवस्थापनासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ वसंत हिस्सल यांनी संत गाडगे महाराजांचे जीवनचरित्र सांगून समकालीन अर्थव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अनिल देशमुख, डॉ भरत शेळके, डॉ सूर्यकांत राठोड, डॉ अतुल बिराजदार, डॉ डॉ राजेंद्र सूर्यवंशी,प्रा मनोज गायकवाड, शिबिरातील स्वंयसेवक विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ अनिल देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन निरंजन कटके यांनी तर कार्यक्रमाधिकारी डॉ भरत शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
