परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील शेळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकृत दस्तऐवज आणि अभिलेखांमध्ये जाणीवपूर्वक खाडाखोड  करून फेरफार करण्यात आल्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप गावातील काही जागरूक आश्विनी मगर यांनी केला आहे. याबाबत माहिती साठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन या वरिल आरोपामुळे केवळ शेळगावमध्येच नव्हे, तर संपूर्ण तालुका पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.


काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, शेळगाव ग्रामपंचायतीच्या काही महत्त्वपूर्ण नोंदी, सरपंच, ग्रामसेवक  यांनी  संगनमत करून खाडाखोड करून बदल केले आहेत.मूळ नोंदींमध्ये दस्ताऐवजा वर खाडा खोड करून नवीन माहिती घुसडण्यात आली असून, हा प्रकार पदाचा गैरवापर करून केल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.


आश्विनी मगर यांचा थेट आरोप

या प्रकरणातील प्रमुख तक्रारदार आश्विनी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना थेट ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहिलेली नाही. विशिष्ट फायद्यासाठी अधिकृत सरकारी अभिलेखांमध्ये बदल केले गेले आहेत, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे,“असे आश्विनी यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणाचे पुरावे लवकरच जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणार असल्याचेही सांगितले.


प्रशासकीय चौकशीची मागणी

हा शासकीय दस्तऐवजातील फेरफाराचा गंभीर गुन्हा असल्याने, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने प्रशासकीय चौकशी सुरू करावी, अशी मागणी मगर याणी परंडा तालुका प्रशासनाकडे केली आहे. या गंभीर आरोपामुळे शेळगाव ग्रामपंचायतीचे कामकाज सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून,आता परंडा पंचायत समितीचे अधिकारी यावर काय भूमिका घेतात आणि चौकशी कधी सुरू होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 
Top