वाशी (प्रतिनिधी)- भैरवनाथ शुगर वर्क्स लि., इंदापूर युनिट नं. 7 या साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2025-26 च्या प्रथम मोळी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या शुभहस्ते हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 13 वर्षानंतर इंदापूर येथील साखर कारखाना पुन्हा कार्यरत झाला आहे.
या प्रसंगी बोलताना चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले की, गेली तब्बल 13 वर्षे बंद असलेला नरसिंह साखर कारखाना आमदार तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या काही दिवसांत मशिनरी दुरुस्ती, तांत्रिक सुधारणा व आवश्यक तयारी पूर्ण करून पुन्हा गाळपासाठी सज्ज करण्यात आला आहे. भुम, परंडा व वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस कोणत्याही परिस्थितीत गाळपाविना राहणार नाही. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस पूर्ण होईपर्यंत कारखाना अखंडपणे सुरू ठेवला जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी व्हाईस चेअरमन केशव सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याचे नमूद करत अनिल सावंत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याचे आर्थिक व औद्योगिक बळ वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन मकेशव सावंत यांची कन्या श्रेया सावंत, शिवशक्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन आण्णासाहेब देशमुख, संचालक बाबुराव घुले, बिभीषण खामकर, ॲड. सत्यवान गपाट, इंदापूरचे सरपंच गणेश गपाट, रणजित घुले, विकी चव्हाण, अक्षय चव्हाण, सुनील जाधवर, मुन्ना मणगिरे, अतुल चौधरी, शिवहार स्वामी, प्रकाश शेटे, बाळासाहेब मांगले, विकास तळेकर, वाडेकर साहेब, शेटके साहेब यांच्यासह कारखान्याचे जनरल मॅनेजर एस. एल. पाटील, चीफ केमिस्ट देशमुख, चीफ इंजिनिअर अविनाश पवार, मुख्य शेती अधिकारी शिवकर, चीफ अकाउंटंट रामचंद्र कारंडे, कामगार अधिकारी सुरज उंदरे, कर्मचारी-कामगार, ऊस तोडणी ठेकेदार, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
