तुळजापूर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ओ.बी. सी. सेलच्या तुळजापूर शहराध्यक्षपदी श्रीकांत रसाळ यांची निवड करण्यात आली आहे. तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची नुकतीच आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीतच रसाळ यांची ओ. बी सी. सेलच्या शहराध्यक्षपदी निवड केली आहे. यावेळी ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अमोल कुतवळ, अमर मगर, रणजित इंगळे, आनंद जगताप, नागनाथ भांजी, काँ आदींची उपस्थिती होती.


 
Top