तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने विभाग स्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी हे विद्यालय नेहमीच अग्रस्थानी राहिलेले आहे.
सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे झालेल्या विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. या यशामागे क्रीडा विभाग प्रमुख राजेश बिलकुले, रणविजय काटंबे, ज्ञानेश्वर माने, रोहित घोडके व मुगुटराव अशोक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे संस्थाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, सर्व विश्वस्त, प्राचार्य वैजनाथ घोडके, पर्यवेक्षक डॉ. पेटकर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले. सर्वांनी विजयी पथकाला आगामी राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
