धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी गोवर्धनवाडी येथे नवीन उपडाकघर (पोस्ट ऑफिस) सुरू करण्यात आले असून, या उपक्रमाचा शुभारंभ खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला स निलावती नवनाथ लोमटे (सरपंच, ग्रामपंचायत गोवर्धनवाडी), विनोद थोडसरे (उपसरपंच, गोवर्धनवाडी), संजय आंबेकर (डाकघर अधीक्षक), श्रीकांत माने ( सहाय्यक अधीक्षक), सचिन स्वामी (डाक निरीक्षक), शाम गायकवाड ( सहाय्यक अधीक्षक) तसेच मुरलीधर लोमटे, महेश वाघमोडे, शिवाजी नाना घाडगे, पांडुरंग वापमारे, हनुमंत थोडसरे, मधुकर शेंडगे, प्रभाकर शेंडगे, नामदेव भोरे, बाळासाहेब लोमटे, आगरचंद लोमटे (काका), तीर्थराज घाडगे, महेश घाडगे, सूर्यकांत वाघमोडे, जीवन वीर, सागर वीर, जालिंदर केंद्रे सर, शाम लोमटे, रामभाऊ कावळे आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच डाक विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि गावकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागात सरकारच्या सेवा पोहोचवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पाठवलेल्या पत्रांद्वारे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही पोस्ट ऑफिसचे स्वप्न साकार झाले. या उपडाकघरामधून ग्रामस्थांना खालील सुविधा आता गावातच उपलब्ध होतील. सर्व डाक योजना लाभ डीबीटी फॉर्म भरून थेट खात्यात पैसे जमा, सुकन्या योजना व विविध विमा योजना, फक्त 549 मध्ये 10 लाखांचा विमा कवच, आधार कार्ड दुरुस्ती सुविधा या सर्व सुविधांमुळे ग्रामीण भागातील अनेक अडचणींवर गावातूनच तोडगा मिळणार आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी स्वतंत्र डाक विभाग मिळावा यासाठी लवकरच अधिकृत पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.

 
Top