धाराशिव (प्रतिनिधी)-  “राष्ट्रीय एकता दिवस” 2025  पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनातून सरदार वल्भभाई पटेल यांच्या 150 व्या जंयती निमीत्त आज दि.31.10.2025 रोजी सकाळी 07.00 वाजता धाराशिव शहरामध्ये आनंदनगर पोलीस ठाणे येथे धाराशिव जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्हास्तरीय ‌‘रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी  दौड' या 5 कि.मी. दौडेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पोलीस अधीक्षक रितु खोखर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, पोलीस उप अधीक्षक राउत, भोसले या सर्वांच्या हस्ते झेंडा दाखवून रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी  महोत्वसी दौडची सुरुवात आनंदनगर पोलीस ठाणे येथून करण्यात आली. सदर रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी दौडेत धाराशिव पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थितीत होते. सदर दौडेचा मार्ग आनंदनगर पोलीस ठाणे- जिजाउ चौक बार्शी नाका येथून परत त्याच मार्गे आनंदनगर पोलीस ठाणे येथे दौडचा समारोप झाला.  तसेच धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे येथे ‌‘रन फॉर युनिटी व वॉक फॉर युनिटी ' या 5 कि.मी. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांसह शाळेचे विद्यार्थी व नागरिक  हे उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संगीत वाद्य पथकाद्वारे जनजागृती तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरु चौक तसेच तुळजापूर व कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलीस दलातील संगीत वाद्य पथकातील पोलीस अंमलदार बालाजी सहाणे, लक्ष्मण चांदणे, श्रीमंत पालके, रामहरी कांबळे, विकास कसबे, यांनी उत्कृष्टरित्या जनजागृती तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले.

 
Top