धाराशिव (प्रतिनिधी)-  स्थानिक गुन्हा शाखेचे पथक 30 ऑक्टोबर 2025 च्या पहाटे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अल्युमिनियम तारेची चोरी करणारा सशयित आरोपी कळंब येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आरोपीस ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता ढोकी हद्दीतील गोवर्धनवाडी येथे अल्युमिनियम तार साथीदारांच्या मदतीने चोऱ्याचे कबुल केले. सदर आरोपी 10 लाखाच्या मुद्देमालास ढोकी पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा शाखेचे पथक कळंब हद्दीत असताना गुप्त बातमीवरून संशयित आरोपी नामे  अब्दुल जोहर शेख, रा. कळंब, ता. कळंब, जिल्हा धाराशिव याने ढोकी परिसरात तारेची चोरी केली आहे. अशी बातमी मिळाल्यावर आरोपीस सिताफिने ताब्यात घेऊन त्याने केलेल्या चोरीची तसेच त्याच्या साथीदाराबाबत माहिती विचारली असता त्याने ढोकी हद्दीत गोवर्धन वाडी येथे ॲल्युमिनियम तार साथीदारांच्या मदतीने चोरी केली असल्याचे सांगितले. तसेच गुन्हे अभिलेख पाहिला असता पोलीस ठाणे ढोकी येथे सदर बाबत गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने मुद्देमाल बाबत माहिती दिली. ताब्यात असलेल्या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप आणि चोरी केलेला मुद्देमाल पाच किलोमीटर अल्युमिनियमची तार असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे . ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हा केल्याची कबुली  दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे ढोकी येथे पुढील कारवाई कामी हजर केले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार,पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, चापोका रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे. 

 
Top