धाराशिव (प्रतिनिधी) - नगर परिषद अंतर्गत प्रभाग 9 मधील प्राथमिक यादीमध्ये प्रभागात राहणाऱ्या मतदारांची नावे नाही. जी नावे मतदार यादीत नाहीत त्यांची नावे आधार कार्डसह नगर परिषदेच्या विहित नमुन्यातील अर्जाद्वारे आपेक्ष नोंदविला. याबाबत नगरपरिषदेच्या बी.एल.ओ. यांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून खात्री केलेली आहे. तरी देखील नगरपरिषदेने जी अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये अक्षेपाप्रमाणे 85 ते 90 टक्के मतदारांचे फोटो आलेले नाहीत. त्यामुळे आक्षेप नोंदविलेल्या मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या मतदारांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन संतोष उर्फ नाना घाटगे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.4 नोव्हेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक 9 हा भाग छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस मुख्यालय कोहिनूर हॉटेल माणिक चौक जिजाऊ चौक आर्य समाज गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असा मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेला भागाचा समावेश केलेला आहे. असे असताना देखील या प्रभागाच्या मतदार याद्यांमध्ये नसलेल्या काळा मारुती चौक, मारवाडी गल्ली, सावरकर चौक या भागातील मतदारांची नावे समाविष्ट केले आहेत. त्यामुळे इतर प्रभागातील मतदारांची नावे रद्द करून या प्रभागात पुराव्यासह दिलेल्या सर्व मतदारांची नावे फोटोसह समाविष्ट करावीत अशी मागणी केली आहे. यावर यावर समता सहकारी गृह निर्माण संस्थेचे चेअरमन संतोष उर्फ नाना घाटगे, आयुब शेख, रामचंद्र जोशी, वासुदेव वेदपाठक, हरिदास लोमटे, आकाश लष्करे, बंटी कादरी, मंसुर शेख, वैभव गरड, रोहीत घाटगे, शैलेश काळे व रोहन घाटगे यांच्या सह्या आहेत.


 
Top