तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक टी आर. भालेराव यांच्या विरोधात कर्तव्यातील निष्काळजीपणा आणि अयोग्य आचाराबद्दल कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात असताना गुन्हे तपासातील गंभीर त्रुटी, वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष, तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत योग्य ती कारवाई न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात न्यायालयीन प्रकरण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालाच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी शिस्तभंगाची कारवाई करत 2000 दंड आकारण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई मुंबई पोलीस (शिस्त व अपील) नियम 1956 च्या कलम 3 (2)( V) नुसार करण्यात आली आहे. संबंधित आदेशानुसार, तुळजापूर पोलीस ठाण्यातील कामकाजात निष्काळजीपणा व गैरवर्तन झाल्याचे निष्पन्न झाले असून, भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिस अधीक्षकांनी दिला आहे. या आदेशाची प्रत तुळजापूर पोलीस निरीक्षक तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. सदरील आदेश रितू खोखर पोलिस अधीक्षक, धाराशिव यांच्या स्वाक्षरी निशी निघाला आहे.


 
Top