मुरुम  (प्रतिनिधी) - नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील  महाविद्यालयाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक सभागृहात शिक्षणमहर्षी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या नावाने दरवर्षी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी (ता. १९) रोजी करण्यात आले. हे यंदाचे २४ वे वर्ष आहे. यावेळी स्पर्धेचे उद्धाटक जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी, पंचायत समितीचे सभापती मदन पाटील, उपसभापती गोविंद पाटील, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, संस्थेचे संचालक राजेंद्र भोसगे, प्रा. डॉ. सतिश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सादक वली, प्राचार्य उल्हास घुरघुरे, परीक्षक प्रा. डॉ. संजय बिराजदार, डॉ. विवेकानंद वावळे, प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील आदर्श शिक्षक प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे, प्रा. डॉ प्रकाश कुलकर्णी, शिक्षकेत्तर कर्मचारी मल्लिकार्जुन स्वामी यांचा बापूराव पाटील यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी केले. यावेळी डॉ. सतिश शेळके, डॉ. सादक वली यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. सपाटे म्हणाले की, कै. माधवराव पाटील यांनी या परिसरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संस्थेने लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा म्हणून दरवर्षी वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे शेवटी ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी मानले. यावेळी विविध महाविद्यालयाचे स्पर्धक, विविध शाखेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.      

 
Top