परंडा(प्रतिनिधी)- राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परंडा  वतीने जनता दरबारचे आयोजन वाकडी, ता. परंडा येथे करण्यात आले होते. 

भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार @३ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटात वाकडी येथे श्री राम मंदिर परिसरात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी १५४ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करीत तक्रारींचा निपटारा करण्यात आला. 

या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी भाजपा च्या वतीने प्रत्येक विभागांचे‌ प्रमुख नेमण्यात आले असून लवकरच दखल तक्रारी मार्गी लागणार आहेत.   या आयोजित जनता दरबारात भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, सुखदेव टोंपे, ता. उपाध्यक्ष मुकुंद चोबे, प्रदिप लोंढे, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, आप्पासाहेब जगताप, धनंजय जगताप, हनुमंत रगडे, कुमार सातपुते, पांडुरंग सावंत, कैलास पाटील, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, बाबासाहेब जाधव, सारंग घोगरे, धनंजय काळे, अर्जुन कोलते, रामदास गुडे, भगवान चव्हाण, अजित ठोंगे, राज रगडे, रघुनाथ बानगुडे, राजाभाऊ देवकते, रवींद्र अंधारे, सतीश रगडे, विनोद शिंदे, संभाजी पाटील, नानासाहेब बानगुडे, कल्याण डोके, बंडू शिंदे, ब्रह्मदेव लोंढे, औदुंबर रगडे, नामदेव रगडे, प्रकाश पाटील, भारत पवार, कैलास पाटील, ब्रह्मदेव सोनमाळी, सौदागर लोंढे, ज्योतीराम लोंढे, नानासाहेब फाटक, राजाभाऊ फाटक, सौदागर फाटक, सुनील लोहार, धनाजी लोहार, जयंत सायकर, किरण कवटे, व्यंकटेश दिक्षित, कार्तीक दिक्षित तसेच मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top