धाराशिव (प्रतिनिधी)- श्री 1008 पार्श्वनाथ सै दिगंबर जैन मंदीर धाराशिव तर्फे पर्युषण महापर्व समापन सोहळा आज मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.यानिमित्ताने सकाळी 8वाजता श्रीं ची पालखी व शोभायात्रा काढण्यात आली.यानंतर मंदीर मध्ये चढाव घेऊन पंचामृत आभिषेक शांतीधारा व पूजन करण्यात आले.आजच्या धार्मिक विधीचा इंद्र इंद्राणी होण्याचा मान धर्मानुरागी धर्मप्रेमी परम गुरुभक्त सौ संजना उर्फ श्वेता श्री सागर राहूलजी दुरूगकर यांना मिळाला.सौ रेखाताई व श्री रमेश रतिलाल फडकुले यांच्यातर्फे प.पू.आचार्य विद्यासागर महाराज लिखित शास्त्र दान करण्यात आले.श्रीमती हेमाताई,सौ वृषाली व श्री संकेत सतिश फडकुले यांच्या तर्फे महाप्रसाद देण्यात आला.संध्याकाळी गुणवंतानचा सन्मान तसेच धार्मिक स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल अजमेरा,अमित गांधी,हेमंत पांडे,प्रसन्न फडकुले,रमेश फडकुले,स्वप्निल फडकुले,महावीर दुरूगकर,प्रविण बोपलकर,सुहास हिंदाने,मनोज चाकवते,उल्हास चाकवते,सुदेश फडकुले,प्रशांत येणेगूरे,अतुल कांबळे,श्रीवीर पलसे,सुनिल वायकर यांनी विशेष कार्य केले.सकल जैन समाज धाराशिवचे सर्व बंधू व भगिनी हजर होत्या.

 
Top