धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धाराशिव फेस्टिव्हलचे शनिवारी (दि.13) शहरातील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात थाटात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर या महोत्सवात पहिल्याच दिवशी निमंत्रित कवींचे राज्यस्तरीय कवीसंमेलन झाले. यात राज्याभरातून निमंत्रीत कवींनी बाहेर जशी पावसाची बरसात सुरु होती. त्याचप्रमाणे या संमेलनात एकापेक्षा एक सरस अशा आपल्या कविता सादर करत शब्दीक बरसात केली. त्यास रसिक, श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन प्रतिसाद दिला.

तत्पूर्वी या दोन दिवशीय फेस्टिव्हलचे उद्घाटन धाराशिव-कळंब विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास पाटील, उमरगा-लोहारा मतदार संघाचे आमदार प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मेनांक घोष, राष्टवादी शरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव, उद्योजक अमित मोदाणी, जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास पाठक, सचिव रविंद्र केसकर, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रसेन देशमुख, महेश पोतदार, बालाजी निरफळ, जी. बी. राजपुत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरवात धाराशिव शहरातील कला संगित संस्कार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सुरेख अशा बासरी वादनाने झाली. यावेळी आ. केलास पाटील, आ. प्रविण स्वामी, जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, सीईओ मेनाक घोष यांनी पत्रकार सघांच्या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज्यस्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलनास सुरुवात झाली. यामध्ये प्रा. प्रशांत मोरे (मुंबई), भरत दौंडकर (पुणे), अविनाश भारती, माजलगाव, यामिनी दळवी (मुंबई), छत्रपती संभाजीनगर येथील नारायण पुरी, गुंजन पाटील, नीलेश चव्हाण या राज्यभर सुपरिचित असलेल्या कवींनी सहभाग नोंदवत आपल्या कविता सादर करत रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रसेन देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन महेश पोतदार तर आभार जी. बी. राजपुत यांनी मानले. यावेळी कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार राजाभाउ वैद्य, दिलीप पाठक-नारीकर, राजेंद्रकुमार जाधव, आप्पासाहेब शेळके, मच्छिंद्र कदम, राकेश कुलकर्णी, आकाश नरोटे, शितलकुमार धोंगडे, शितल वाघमारे, अमोल गाडे, सलीम पठाण, प्रशांत कावरे, रहिम शेख, विशाल जगदाळे, सागर जाधव यांच्यासह पत्रकार संघाचे जिल्हाभरातून आलेले विविध पदाधिकारी, विविध राजकीय, सामाजिक, शेक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी, शहरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे सायंकाळी 6.30 वाजता सुरु झालेल्या कार्यक्रमाबरोबर पावसाचीही दमदार बरसात सुरु झाली. त्याप्रमाणे कवींनी आपल्या कवितांची बरसात सुरु केली. त्यास शहरातील नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन प्रतिसाद दिला. रात्री 9.30 वाजेपर्यंत एकापेक्षा एक सरश कविता कवींनी सादर केल्या.


 
Top