तुळजापूर (प्रतिनिधी)- बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी उद्याधाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाज मंगळवार दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी तुळजापूर येथे भव्य शक्ती प्रदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 11 वाजता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार असून, या प्रसंगी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बंजारा बांधव उपस्थित राहणार आहेत. “ऊठ बंजारा जागा हो, आरक्षण लढ्याचा धागा हो“ अशा घोषणांनी हा मेळावा उत्साहात रंगणार असून, बंजारा समाजाच्या एकतेचे व अस्तित्वाचे दर्शन घडविण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनात्मक मेळाव्यात समाजातील प्रतिष्ठित नायक, कारभारी, हासाबी-नसाबी यांच्यासह युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

निमंत्रक म्हणून सकल गोर बंजारा समाज, धाराशिव यांनी आवाहन केले असून, आरक्षणाच्या लढ्यात एकजूट दाखविण्यासाठी समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 
Top