धाराशिव (प्रतिनिधी)- कानपूर (उत्तर प्रदेश) येथे “I Love Mohammad” असे फलक लावून फेसबुकवर पोस्ट केल्याच्या कारणावरून 25 मुस्लिम तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याच्या घटनेचा धाराशिव जिल्ह्यात तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेमुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून धार्मिक सौहार्द बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी 19 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे मोर्चा काढून महामहीम राष्ट्रपती महोदयांना निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, अशा प्रकारच्या कृतींमुळे समाजात दूजाभाव, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण होत असून शांतता व कायदा सुव्यवस्थेला धोका पोहोचतो. परिणामी देशाची एकता व अखंडता धोक्यात येऊ शकते.
यावेळी निवेदनकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचा संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केली. कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभावास मनाई आहे. कलम 19 प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापन करण्याचा व एकत्र येण्याचा अधिकार आहे. परंतु हे अधिकार इतरांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचेल अशा स्वरूपात वापरता येणार नाहीत. कलम 21 प्रत्येक नागरिकाला जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कलम 25 ते 28 प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचा, उपासना करण्याचा आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. मात्र, या अधिकारांचा उपयोग करून इतरांच्या श्रद्धा दुखावणे संविधान मान्य करत नाही. म्हणूनच संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच भविष्यात इतर राज्यांमध्ये अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य करून त्रास देण्याच्या घटना होऊ नयेत, यासाठी महामहीम राष्ट्रपती महोदयांनी सर्व राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी सय्यद खलील सर, मौलाना जाफर अली खान, मौलाना अयुब साब तौफिक काझी, माजी नगरसेवक मुनीर कुरैशी, मुहीब अहमद, वाजिद पठान, इस्माईल शेख, इरफान शेख, , जमील सय्यद, अबरार कुरैशी, इर्शाद कुरेशी, बबलू बागवान, आतेफ काजी, शायान रझवी, सलमान शेख, सलमान मुल्ला,एजाज मुजावर , शाहनवाज सय्यद, अस्लम मुजावर, अरबाज नदाफ, नोमान रझवी, इर्शाद सय्यद, सद्दाम मुजावर, साबेर सय्यद ,शेख रईस इस्माईल ,अलीम कलीम कुरेशी,अल्ताफ शेख ,शेख अकबर,इकबाल पटेल ,बिलाल कुरेशी , खालेद कुरेशी ,अलिमोद्दीन काजी , अन्सार काझी, नसरुल्लाह खान ,शेख शकिब,गफार शेख ,जावेद फराश,अलीम काझी.यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांनी सजलेल्या या निवेदनातून समाजात धार्मिक सौहार्द अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने कठोर व काटेकोर पावले उचलण्याची एकमुखाने मागणी करण्यात आली.