कळंब (प्रतिनिधी)- येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाच्या अनुषंगाने दि. 18 सप्टेंबर रोजी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

 कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय  येथील रुग्ण कल्याण समितीचे सदस्य गोविंद चौधरी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम यु.शेळके, डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. सुधीर आवटे, डॉ. सायास केंद्र यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग, स्तन व गर्भाशय, मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, कान नाक घसा, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकलसेल आजार व रक्तशय तपासणी, रक्तदान शिबिर, किशोरवयीन  मुलींना मार्गदर्शन व तपासणी, मानसोपचार, त्वचारोग,सर्जरी सेवा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड, माता व बाल सुरक्षा कार्ड, आयुष्मान कार्ड, विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच टी.बी. रुग्णा रुग्णांना टेक होम राशन इत्यादी सेवेचा यात  समावेश होता. सदर शिबिरामध्ये उपस्थित सर्वांना स्वस्थ नारी सशक्त परिवार ,कुष्ठरोग, तंबाखू प्रतिबंध, अवयवदान, एड्स प्रतिबंध इत्यादी ची शपथ देण्यात आली.

शिबिरामध्ये एकूण 724 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यामध्ये गरोदर माता तपासणी 48, बालक लसीकरण 42, हिमोग्लोबिन तपासणी 328, रक्तदाब तपासणी 240, शुगर तपासणी 240, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी 11, मुख कर्करोग तपासणी 27, स्तन कर्करोग तपासणी 11 ,आयुष्मान कार्ड 30, मानसोपचार तपासणी 11, बालरोग तपासणी 44, कान नाक घसा तपासणी 18, त्वचारोग तपासणी 12, अस्थीरोग तपासणी 13, नेत्ररोग  तपासणी 44, किशोरवयीन सेवा 50, रक्तदान 02, निक्षय पोषण आहार 10  इत्यादी सेवेचा लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 

सदर कार्यक्रमास डॉ शिवाजी फुलारी निवासी बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय धाराशिव, जगन्नाथ कुलकर्णी कान,नाक घसा तज्ञ, डॉ. सुहास शिंदे मानसोपचार तज्ञ, डॉ कुलकर्णी मॅडम त्वचारोग तज्ञ, डॉ. सरफराज शेख, डॉ. आनंद वाकुरे, डॉ. शुभम राऊत, डॉ. मनोज कवडे, डॉ. आयेशा खान, डॉ. दीपक पेठे, डॉ. भक्ती गीते, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. स्वप्निल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top